Hindi Departmental Activities

Departmental- Activities

Sr. NoActivity NameDateView Report
1.Hindi Rashtrabhasha Samaroh14 Sep 2017 to 16 Sep 2017View
2.Hindi Rashtrabhasha Samaroh14 Sep 2018 to 19 Sep 2018View

                                                                                                                       16 / 09 / 2017

      एस. एन. डी. महाविद्यालयात हिंदी दिवस सप्ताह संपन्न …

          एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येवला येथे दि. १४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत हिंदी दिवस सप्ताह साजरा करण्यात आला. शेवटच्या दिवशी दि. १६ सप्टेंबर २०१७ रोजी हिंदी दिवस समारोह या कार्यक्रमासाठी एस. एन. डी. कनिष्ठ महाविद्यालय येवला येथील  प्रा. अण्णा व्हडगळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. ढाकरे यांनी भूषावले. सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. टी. खैरनार यांनी केले. विद्यार्थांनी काव्यवाचन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अण्णा व्हडगळ यांनी हिंदी साहित्यातील कबीर यांच्या दोहे च्या माध्यमातून विद्यार्थांना कबीर चे विचार आजपण समाजासाठी किती अनमोल आहे. तसेच हिंदी भाषेचा आज मोठया प्रमाणात विकास होत आहे. या बद्दल मार्गदर्शन केले.

उदा., कबीर चे विचार  –

                   “ऐसी बानी बोलिए, मन का आपा खोय |
                   औरन को शीतल करै, आपहु शीतल होय ||”

                   “दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
                   जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥” 

          या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. ढाकरे यांनी आपल्या मनोगतात सूरदास चे वात्सल्य वर्णन तसेच हिंदी भाषेवरती असलेले प्रेम विद्यार्थांना सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दीपिका कुक्कर यांनी केले व आभार प्रा. संतोष आहेर यांनी मानले.

          या कार्यक्रमास समारंभ प्रसंगी प्रा. शिवाजी बेंद्रे, प्रा. मढवई दिपक, प्रा. गणपत धनगे, प्रा. संदीप ठाकरे, प्रा. बाबासाहेब गाडेकर, प्रा. माधव बनकर, प्रा. विजय झाल्टे, प्रा. ललित घाडगे, प्रा.वसिम कुरेशी, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. गौरी जोशी, प्रा.नीता मोरे, प्रा. अश्विनी मोरे, प्रा.जयश्री आहेर, प्रा. अण्णा व्हडगळ, प्रा. लक्ष्मण देवडे, प्रा. म्हसे महेंद्र, प्रा. तृप्ती काळगे, प्रा. कविता साळवे व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, श्री. योगेश भावसार, सौ. शरयु भागवत, श्री.संतोष अहिरे, श्री. किरण मुंढे, श्री. गणेश पगारे आदी उपस्थित होते.